Ad will apear here
Next
‘त्यांनी’ जपलीय पत्र लिहिण्याची परंपरा...
देवरुख : अलीकडे सोशल मीडियामुळे पोस्टकार्ड पाठवणारे दुर्मीळ झाले आहेत. आजच्या गतिमान युगात क्षणार्धात संदेश पोहोचवण्याची व्यवस्था असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते नियमितपणे पोस्टकार्डाचा वापर करत आहेत. गेली २० वर्षे ते न चुकता दररोज किमान एक तरी पत्र लिहितात आणि पोस्टाने पाठवतात. 

भारतात १७६४ साली अधिकृत टपाल सेवा सुरू झाली. इंग्रजांनी आपल्या काळात दीडशे वर्षांपूर्वी त्यात सुसूत्रता आणली आणि भारतातील अधिकृत टपाल सेवा सुरू झाली. त्या काळी संपर्काची कोणतीही साधने नव्हती. आजही देशातसुमारे दीड लाख टपाल कार्यालयांमार्फत ही सेवा सुरू आहे. देशातील सर्वांत दुर्गम भागांतही पत्रे, मनीऑर्डर पोहोचवण्याचे काम टपाल खाते करते. देशात इंटरनेटचे आगमन झाले आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यावर पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. 

युयुत्सू आर्तेव्हॉट्सअॅ्प, फेसबुकच्या जमान्यात युवकांना पोस्टाकडे पाहायलाही वेळ नाही; मात्र याच काळात देवरुखातील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्तेंनी मात्र पोस्टाशी असलेले नाते आजही जपले आहे. त्यांचे वडील रमाकांत आर्ते दर महिन्याला किमान १०० पत्रे लिहीत आणि ती पाठवत असत. त्यांनी आपली ही प्रथा अखेरपर्यंत चालू ठेवली होती. वडिलांकडून प्रेरणा घेऊन युयुत्सू यांनीही ही प्रथा गेली २० वर्षे जोपासली आहे. आर्ते यांचा दुचाकी विक्री आणि इन्शुरन्सचा व्यवसाय आहे. दुचाकी घेतल्यावर विमा संपण्याआधी ग्राहकांना कळवण्यासाठी ते पत्राचा आधार घेतात. शिवाय सण, समारंभ, एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण, अभिनंदन, वाढदिवस, विम्याच्या नवीन स्कीम सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ते पोस्टकार्डाचाच आधार घेतात. दिवसाला किमान एक आणि सण-समारंभांच्या काळात ३० ते ४० पत्रे लिहिण्याचा त्यांचा नित्यक्रम आहे. 

‘वडिलांकडून पोस्टाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या, त्यातून त्याचे महत्त्व समजले. व्यवसायात उतरल्यावर मी त्याचा वारसा जपायचे ठरवले. अलीकडे पोस्टकार्ड दुर्मीळ होत चालले आहे. अशा काळात एखाद्याचे पत्र आले, तरी त्याचे खूप कौतुक होते. पोस्टाची हीच सेवा जपण्यासाठी आणि सर्वसामान्यांना त्याची महती पटण्यासाठी शक्य तेवढी वर्षे मी ही पद्धत सुरू ठेवणार आहे,’ असे युयुत्सू आर्ते यांनी सांगितले. 

संपर्क : युयुत्सू आर्ते – ९४२२३ ५१९२६

(फटाकेमुक्त दिवाळीसाठी युयुत्सू आर्ते यांनी राबविलेल्या उपक्रमासंदर्भातील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZUKBU
Similar Posts
मुलांनी घेतली ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची शपथ देवरुख : फटाकेमुक्त दिवाळी हा विषय दर वर्षीप्रमाणेच यंदाही चर्चेत आला आहे. यंदा त्याला न्यायालयाच्या निकालाची पार्श्वभूमी आहे. अर्थात, दिवाळी प्रत्यक्षात फटाकेमुक्त झालेली मात्र दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी
जिल्हा परिषद शाळेने दिला प्लास्टिक पुनर्वापराचा आदर्श संगमेश्वर : प्लास्टिक न वापरण्याबद्दल किंवा त्याच्या पुनर्वापराबद्दल अनेकदा चर्चा होत असलेली आपण ऐकतो; पण त्याबाबत प्रत्यक्ष कृती करणारे हात मात्र अत्यंत कमी असतात. कोळंबे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकने मात्र या बाबतीत आदर्श घालून दिला आहे. गावातील टाकाऊ प्लास्टिक
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील तीन कब्रस्तानमध्ये स्वच्छता रत्नागिरी : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुखच्या श्री सदस्यांनी कब्रस्तान स्वच्छता मोहीम हाती घेऊन हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. रत्नागिरी, कोकणनगर येथील कब्रस्तान, संगमेश्वर मापारी मोहल्ला व देवरुख येथील
पुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील देवरुख : महिला बचत गटांच्या पारंपरिक व्यवसायाला छेद देऊन रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील श्री सद्गुरू सेवा सहकारी संस्थेतील महिलांनी एक नवी वाट चोखाळली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने या गटातील महिलांनी आकाशकंदील बनवण्याची ऑर्डर स्वीकारली असून, त्यांनी बनविलेले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language